चंद्रपूर जिल्ह्यातील चर्चित दुहेरी हत्याकांडाबाबत मोठी अपडेट

138

News34 chandrapur

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथ बाबा मठातील दोन शेतकऱ्यांची बुधवारी मध्यरात्री हत्या करून दानपेटी पळविल्याची प्रकार गुरुवारी सकाळी समोर आला. Chandrapur double murder


या घटनेतील आरोपींचा त्वरित शोध घेण्याबाबत खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. आरोपींनी त्वरित अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
 Chandrapur crime news

मांगली येथील बापूराव संभा खारकर (७७) व मधुकर लटारी खुजे (६०) या दोन शेतकऱ्यांची जगन्नाथ बाबा मठात निघृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे समाज मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोपींच्या त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करणे अत्यावश्यक असल्याचे पोलीस अधिक्षकांसोबत झालेल्या बैठकीत खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हटले.

सदर हत्याकांडाला 5 दिवस लोटल्यावर सुद्धा पोलिसांना आरोपीचा थांगपत्ता लागला नाही, एकेकाळी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना काही अवधी लागायचा मात्र याप्रकरणात आरोपी पोलिसांच्या 2 पाऊल पुढे असल्यासारखे चित्र दिसत आहे.

इतके दिवस लोटूनही पोलीस प्रशासनाच्या हाती आरोपी लागले नसल्याने खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांना स्वतः पोलीस अधीक्षकांची भेट घेत याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, जर आरोपी असेच मोकाट फिरणार तर सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कुणावर असेल?
bottom