चंद्रपूर महानगरपालिकेने 2 दुकानांना ठोकले सील

63

News34 chandrapur

चंद्रपूर – ८२,३२७ रुपयांची थकबाकी असणाऱ्या वरोरा नाका चौक साई अपार्टमेंट येथील नाजिया मुल्ताजी लाखनी यांच्या मालकीच्या गाळ्याला तसेच ८४,४३४ रुपयांची थकबाकी असणाऱ्या अंचलेश्वर वॉर्ड येथील विठाबाई खाडीलकर यांच्या मालकीच्या गाळ्याला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे.

मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकाने कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. Property tax
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत ५० टक्के सूट मिळण्याची २६ मार्च अंतिम तारीख असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. Tax recovery campaign
सदर कारवाई ६ मार्च रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले,अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,पथक प्रमुख नागेश नित,नरेंद्र पवार,अमित फुलझेले,चिन्मय देशपांडे,अमुल भुते,प्रगती भुरे,अतुल भसारकर,रवींद्र कळंबे,सोनू थुल,प्रतीक्षा जनबंधु,अतुल टिकले,सागर सिडाम,विकास दानव,चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.
bottom