काष्ठपूजन शोभायात्रेत सामील झाला महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ

बल्लारपूर शहरात निघाली भव्य शोभायात्रा

702

चंद्रपूर/बल्लारपूर – अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले असून मंदिरातील दरवाजे, खिडक्या, व गर्भगृहातील महाद्वार निर्माणकार्यासाठी वनविकास महामंडळ मधील उच्च दर्जाचे सागवानाची निवड करण्यात आली.

आज बल्लारपूर येथील वनविकास महामंडळाच्या आगारातून सागवान लाकडांची विधिवत पूजा करण्यात आली, त्यानंतर भव्य काष्ठपूजन शोभायात्रा बल्लारपूर शहरातून काढण्यात आली.
या शोभायात्रेत तब्बल 2 हजार लोक कलावंतांनी आपली हजेरी लावली असून शोभयात्रेच्या माध्यमातून ते आपली कला सादर करीत आहे.
विविध राज्यातील लोक कलाकृतीचे सादरीकरण करण्यात आली, विशेष बाब म्हणजे 26 जानेवारीला दिल्ली येथील गणतंत्र दिनी काढण्यात आलेल्या परेड मध्ये महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ देखील शोभायात्रेत सामील झाला.
या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेश येथील उच्चतंत्र शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, स्टॅम्प न्यायालय शुल्क राज्यमंत्री रवींद्र जयस्वाल व वन व पर्यावरण राज्यमंत्री डॉ. अरुनकुमार सक्सेना यांची विशेष उपस्थिती लाभली.
बल्लारपूर येथे शोभयात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यावर चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली मंदिर येथे सायंकाळी विधिवत काष्ठपूजन करीत शोभयात्रेचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे.
रामायण या नाटकातील राम, सीता व लक्ष्मण ची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया व सुनील लहीरी यांनी सुद्धा सागवान काष्ठ चे विधिवत पुजण केले.
bottom