मुल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बोरचांदली येथे पीक प्रक्षेत्र पाहणी कार्यक्रम

54

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – मुल तालुक्यातील मौजा दत्तक ग्राम बोरचांदली येथील प्रगतशील शेतकरी राजू पाटील येनुगवार यांच्या शेतातील प्रक्षेत्रावर विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी प्रक्षेत्र दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  progressive farmer news

                     कृषक भारती को – आप्रेटीव्ह लिमिटेड चंद्रपूर यांचे वतीने दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार, विशेष अतिथी बोरचांदली ग्राम पंचायत उपसरपंच हरिभाऊ येंनगंटीवार, विविध पीक प्रक्षेत्राचे प्रमुख मार्गदर्शक कृभको कंपनीचे पियूष नेमा, इफकोचे रितेश मलगार, प्रगतशील शेतकरी राजू पाटील  येनुगवार, ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगुरे, प्रगत शेतकरी गुरुदास चौधरी, इंजी.अजिंक्य मारकवार, आदी मान्यवर उपस्थित होते.     

                                               शेतकरी हा क्रुभको कंपनीचा मालक आहे. या उदात्त हेतूने कंपनी शेतकऱ्यांचे पीक व उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न करीत आहे. याला या गावातील शेतकरी कंपनीला खूप सहकार्य करीत असल्याचे मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी पियूष नेमा यांनी केले. प्रमुख अतिथी पत्रकार गुरु गुरनुले यांनीही शेतकऱ्यांना विकासात्मक मार्गदर्शन केले.तसेच अजिंक्य मारकवार यांनीही कंपनीच्या माध्यमातून शेती सुधारावी असे मत व्यक्त केले. प्रगत शेतकरी गुरुदास चौधरी यांनीही शेती सुधारण्यात महिलांचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले.तर अध्यक्षीय भाषणात राजू पाटील मारकवार यांनी शेती सुधारायची असेल तर शेतकऱ्यांनी कृषी गट स्थापन करुन शासनाच्या विविध योजना राबवाव्या असे सांगितले. कार्यक्रमाला शेतकरी प्रा.गोपाळ हरणे,राजू बोरकर, संजय पा. कुंटावार, युवराज चौधरी, धनराज मोहुरले,हिवराज ठेमस्कर,रवी चौधरी, यशवंत देवगडे,अरविंद मुप्पावार,नीलेश अल्लूरवार,रोशन लाडे,वीरेंद्र गड्डमवार, सतीश काटपल्लीवार, महिला शेतकरी मेघा कटकमवार, सुषमा कुंटावार,अपर्णा कुंटावार, पूर्णा कटकमवार, सोनी येलट्टीवार,पल्लवी येनुगवार, अश्विनी येनुगवार, सुजाता येनुगवार यांचेसह परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थित महिला शेतकरी यांना कंपनीकडून वृक्ष भेट देण्यात आली. तसेच कृभको व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. संचालन व आभार महेश पाटील कटकमवार यांनी मानले. भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

bottom