चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल परिसरात मानव वन्यजीव संघर्ष हा काही नवा नाही, मात्र आता वन्यप्राणी शहराच्या मार्गाने कूच करीत असल्याचे दिसून येत आहे.
Chandrapur forest
चंद्रपुरातील जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी मानवी पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. Breaking news
याबाबत अधिक माहिती मिळाली असती अष्टभुजा प्रभागात राहणारे भजन बाराई हे जंगल परिसरात लाकूड तोडायला गेले होते, मात्र ते वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रात गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने भजन बाराई यांच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. Tiger attack
भजन बाराई हे जंगलात लाकूड तोडायला गेले होते मात्र ते परत आले नाही, त्यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला असे अशी शक्यता नाकारता येत नाही. जंगल परिसरात पायाचा अवयव आढळून आले असून उर्वरित अवयव कुठे आहे? याबाबत वनविभाग जंगल परिसरात शोध घेत आहे.
बाराई यांच्या मृत्यूबाबत ही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बाराई यांच्यावर वाघ किंवा बिबट्याने हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, जिल्ह्यात आज वादळी वारा व पाऊस असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली असून बाराई यांचा उद्या शोध घेणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.