तो व्हिडीओ कॉल त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला

त्या लव स्टोरीचा असा अंत झाला

1123

News34Chandrapur
घुगुस – 28 मार्चला दुपारी घुगुस येथे प्रेमी युगलाने विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर मुलाचा 30 मार्चला मृत्यू झाला.
Suicide video call

 

विशेष म्हणजे आत्महत्येचा हा प्रयत्न व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून करण्यात आला होता, शहरातील गांधीनगर निवासी 27 वर्षीय राकेश जेणेकर व रामनगर येथे राहणारी 24 वर्षीय शुभांगी भोंगडे हे दोघे प्रियकर प्रेयसी असल्याची माहिती आहे.
Whatsapp video call

दुपारी दोघांनी एकमेकांना व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून सम्पर्क साधत उंदीर मारण्याचे औषध पीत आत्महत्येचा प्रयत्न केला, सदर बाब कुटुंबियांना कळताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात हलविले असता गंभीर अवस्थेत मुलीचा मृत्यू झाला तर दुसरीकडे राकेश ने 30 मार्चला रुग्णालयात उपचार घेत असताना प्राण सोडला.

दोघांच्या घरी लग्नाला विरोध व मुलावर कर्जाचा डोंगर उभा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे हे प्रकरण घडले.

या आत्महत्येमागील नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे, सध्या घटनेचा पुढील तपास घुगुस पोलीस करीत आहे.

bottom