News34 chandrapur
Modi-Adani relationship
राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात रविवारी (ता. २६) संकल्प सत्याग्रह करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता आयोजित आंदोलनात खासदार धानोरकर बोलत होते. चंद्रपूरच्या तरुणांना विदेशात नोकरीची सुवर्ण संधी
लंडनमध्ये राहुलजी गांधी यांनी भारतातील नागरिक सक्षम असून ते आपल्या समस्या स्वताच सोडवितात, असे वक्तव्य केले. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांनी भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे, असे म्हणून देशाचा अपमान केल्याचा आरोप करीत सभागृह बंद पाडले. त्यानंतर आपल्यावर झालेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी लोकसभेत मत मांडता यावे म्हणून स्वता राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. दोनवेळा पत्रे लिहिली. परंतु, त्यांचा हक्क हिरावून घेण्यात आला. बोलताना माईक बंद करण्यात आला. त्यानंतर थेट खासदारीकी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही खासदार धानोरकर म्हणाले.
देशात संविधानाची पायमल्ली करण्याचे काम सुरू आहे. सर्वत्र अराजकता माजली आहे. हुकुमशाही सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारविरोधात उद्योजक, व्यापारी, नोकरदार असे कुणीही बोलायला तयार नाही. विरोधात बोलणाऱ्या विरोधात विविध यंत्रणाच्या माध्यमातून खोट्या कारवाया केल्या जात आहेत. परंतु, काँग्रेस पक्ष हा मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे. सत्याग्रह आंदोलनातून काळी फित लावून सरकारचा निषेध नोंदविण्यात आल्याची माहिती चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली. Congress latest news today
यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, सेवादलचे अध्यक्ष नंदू खनके, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शफाक शेख, अनिल शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ताजू शेख, ओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव प्राचार्य नरेंद्र बोबडे, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव नंदू वाढई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, सुनीता अग्रवाल, माजी नगरसेविका सकिना अन्सारी, विना खनके, सुनीता लोढिया, अनुताई दहेगावकर, वसंता देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर, तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक जयस्वाल राजू रेवल्लीवार, दुर्गेश कोडाम, यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मलरप्पा, राहुल चौधरी, यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.