आता आयपीएल मध्ये फसवणुकीचा नवीन प्रकार उघडकीस

IPL मध्ये फसवणुकीचा प्रकार

1036

News34 chandrapur

चंद्रपुर – इंडियन प्रीमिअर लीग च्या क्रिकेट मॅच मध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा सट्टा दररोज लावल्या जात आहे, मात्र आता या सट्टा बाजारात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nice pro नामक अवैध वेबसाईट च्या माध्यमातून अनेकांना नव्या आयडी बनवून क्रिकेट वर पैसे लावणाऱ्या पंटर ला QR CODE दिल्या जातो त्या माध्यमातून तो कोड स्कॅन केल्यावर त्यामध्ये पैसे जमा करीत त्याचा स्क्रीन शॉट संबंधित मुख्य बुकीला पाठविण्यात येतो त्यानंतर ती रक्कम कॉइन स्वरूपात आयडी मध्ये जमा होते.

मात्र या दोन दिवसात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या इसमाने nice pro च्या आयडी मध्ये तब्बल 19 लाख रुपये गुंतविले, त्यानंतर तो पैसे जिंकला मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या आयडी मधून सर्व पैसे गायब करण्यात आले.

त्याच्या आयडी मधील व्यवहाराची हिस्ट्री सुद्धा डिलीट करण्यात आली होती, याबाबत बुकीं शी सम्पर्क साधला असता तिथून काही उत्तर त्याला मिळाले नाही.

19 लाख रुपयांचा गंडा बुकींने घातल्यावर याबाबत तक्रार कुठे करायची असा पेच त्या इसमाला पडला आहे, कारण पोलिसांकडे गेल्यास त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता जास्त असल्याने, त्याने स्वतःला तोंड दाबून बुक्कीचा मार खाल्ला असल्याची चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभर चर्चा सुरू होती.

ऑनलाइन जगात अनेक प्रकारे फसवणुकीचे प्रकार होतात, आपल्या बँक खात्यातून सुद्धा पैसे चोरी होतात, मात्र त्यानंतर सुद्धा क्रिकेट वर सट्टा लावणारे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतात याचाच फायदा आता क्रिकेट बुकीं घेत आहे, कारण फसवणूक झाल्यावर त्याची तक्रार कशी करायची असा पेच फसवणूक झालेल्या इस्मासमोर उभा होतो, म्हणून क्रिकेट प्रेमिनो सावध व्हा तुमची फसवणूक व्हायचा आधी हा नाद सोडा.

 

 

bottom