Edens बचत निधीत गुंतविले 29 लाख आणि पुढे झालं असं

गुंतवणूकदारांची फसवणूक

2875

News34 chandrapur

चंद्रपूर :- चंद्रपुरात पुन्हा एका निधी बँकेचा घोटाळा उघडकीस आलेला आहे या घोटाळ्यातील मुख्य चार आरोपी संचालकांना अटक करण्यात आली असून 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fund Savings Bank

ईडेन्स निधी बचत बँक ही सण 2018 पासून चंद्रपूर शहरातील बापट नगर परिसरातील तुकडोजी भवन येथे स्थित आहे.

नियमित दैनिक ठेवी, मासिक ठेवी व फिक्स डिपॉझिट या माध्यमातून गरीब, मजूर, छोटे व्यावसायिक अश्या ठेविदारांच्या बचतीवर अधिक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो लोकांचे ठेवी या निधी बँकेत जमा आहेत. Financial scam chandrapur

फिर्यादी 43 वर्षीय जोसेफ विनोद रामटेके यांचे वडील वेकोली मधून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी Eden’s Bachat Nidhi मध्ये आपल्या आयुष्यातील 29 लाख 50 हजार रुपयांची जमापुंजी गुंतविली होती, काही महिने सदर निधी बँकेने महिन्याचे व्याज दिले मात्र त्यानंतर व्याज देणे बंद झाल्याने रामटेके यांनी निधी बँकेत धडक दिली असता त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

रामटेके यांनी अनेकदा निधी बँकेच्या चकरा मारल्या मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यानंतर जोसेफ रामटेके यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

जोसेफ रामटेके हे एकचं गुंतवणूकदार नसून यामध्ये अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली असून पुन्हा काही गुंतवणूकदार याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी विविध कलमांव्ये निधी बँकेचे संचालक
शाउल शीमॉन,  संजय रामटेके, जितेंद्र थुलकर व सुधाकर ईटेकर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी निधी बचत बँक च्या नावाखाली नागरिकांना व्याजाचे आमिष दाखवीत त्यांची लूट करीत आहे, यासाठी नागरिकांनी सजग होत स्वतःची फसवणूक टाळावी.

bottom