चंद्रपुरात घडला भयावह प्रकार

चंद्रपूर जिल्ह्यात मोब लिचिंग

2015

News34 chandrapur

ब्रह्मपुरी – तालुक्यातील बेळगाव येथे एका मजुराला ट्रॅक्टर ला बांधून बेदम मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Mob leaching chandrapur

 

बेळगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदर कामाचे कंत्राट बीड जिल्ह्यातील भागवत जगताप या कंत्राटदाराला मिळाले आहे.

 

त्यासाठी काम करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मजूर त्या कंत्राटदाराने सोबत आणले आहे, 1 एप्रिल ला पाईप टाकण्याचे काम सुरू असताना मजूर राहुल जगदाडे या मजुराला गावातील नागरिकांनी पकडत त्याला ट्रॅक्टर ला बांधून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

मारहाणीचे कारण म्हणजे राहुल जगदाडे यांनी गावातील महिलेकडे बघितले असता, तू का बघितला म्हणत त्याला दोरीने ट्रॅक्टर ला बांधत बेदम मारहाण केली,  त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देत तक्रार देण्यात आली.

ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात याबाबत कंत्राटदार जगताप यांनी दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, पोलिसांनी तिघांविरोधात कलम 341, 294, 352, 506, 323 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी अरुण पिसे करीत आहे.

 

bottom