अयप्पा मंदिरजवळ बिबट्याचा एकावर हल्ला

बिबट्या पुन्हा आला

1633

News34 chandrapur

भद्रावती – शहरातील आयुध निर्माणी परिसरात अनेक महिन्यापासून बिबट्याची दहशत नागरिकांच्या मनात आहे, यासाठी आयुध निर्माणी व्यवस्थापनाने नागरिकांना सायंकाळच्या सुमारास बाहेर फिरण्यास मनाई केली आहे.

नागरिक सायंकाळच्या सुमारास बाहेर फिरायला गेल्यावर वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला करतात, या घटनेचे प्रमाण खूप वाढले आहे, आतापर्यंत 3 बिबट वनविभागाने जेरबंद केले आहे.

मात्र शनिवारी 6 वाजता अयप्पा मंदिर परिसरात फिरायला गेलेले 37 वर्षीय रमेश गुप्ता यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.  Leopard attack

अचानक झालेल्या बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात गुप्ता यांनी प्रतिकार केला असता परिसरातील धनंजय पांडे यांनी तात्काळ धाव घेत बिबट्याला पळवून लावले, या हल्ल्यात गुप्ता यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली होती.

bottom