अनेक नागरिकांना जखमी करणारा बिबट्या जेरबंद

अखेर तो बिबट्या पिंजऱ्यात कैद

512

News34 chandrapur

भद्रावती : शहराजवळील ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा जवळील अयप्पा मंदिराच्या पाठीमागील परिसरात विविध पाच ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद करण्यात आला.

 

1 एप्रिल ला सकाळी 5 वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. बिबट्याला गंदानाला परिसरातील नर्सरीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

हे आहेत चंद्रपूरचे क्रिकेट जगतातील सट्टेबाज

 

गेल्या अनेक दिवसांपासून पिपरबोडी आणि ऑर्डनन्स कन्स्ट्रक्शन कॉलनीमध्ये चार-पाच जण जखमी झाले होते. ऑर्डनन्स मॅनेजमेंट प्रशासनाने या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता, वनविभागाने बिबट्याला अय्यप्पा मंदिरासह अन्य पाच भागात जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. ऑर्डनन्स कन्स्ट्रक्शन कॉलनी येथे पिंजरे ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हिरा हाऊसजवळ अन्य तीन ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. सदर पिंजरे सहायक वनसंरक्षक (तेंदू) निकिता चौरे, सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, परिक्षेत्र अधिकारी, परिक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशाने लावण्यात आले होते.

वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अखेर 1 एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आले. सदर बिबट्या सुमारे दीड वर्षाचा असून या बिबट्याला सध्या वनविभागाच्या गंदा नाला रोपवाटिकेत ठेवण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले. ही कारवाई वनविभागीय अधिकारी एच.पी. , सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम व त्यांची टीमने केली. दरम्यान, ऑर्डनन्स मॅन्युफॅक्चरिंगचे मुख्य महाव्यवस्थापक विजयकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

bottom