चंद्रपुरातील प्रशासकीय भवनसमोर पोलीस कर्मचाऱ्याला आली भोवळ

दुःखद घटना

1360

News34chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी जयंत अशोक बल्लावार यांचा आज कर्तव्यावर असताना दुर्दैवी मृत्यू झाला.
25 एप्रिलला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास सकाळी प्रशासकीय इमारती जवळून जात असताना जयंत ला अचानक भोवळ आली आणि तो रस्त्याच्या कडेला कोसळला. Chandrapur police

प्रशासकीय भवन जवळून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तात्काळ उचलत, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र उपचार सुरू असताना सकाळी 8 वाजता जयंत चा मृत्यू झाला. Dizzy

जयंत बल्लावार हा चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयातील फुटबॉल ग्राउंड मध्ये कार्यरत होता, सकाळी तो कामानिमित्त बाहेर निघाला होता. Sad news

जयंत च्या निधनाने चंद्रपूर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

bottom