20 एप्रिलला दुर्लभ हायब्रीड सूर्यग्रहण

दुर्लभ हायब्रीड सूर्यग्रहण

1321

News34 chandrapur

चंद्रपूर – २० एप्रिल २०२२३ रोजी होणारे वर्षातील पहिले आणि अतिशय दुर्लभ असे हायब्रीड सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसले तरी यु ट्यूब,टीवी चेनल्स आणि इंटरनेट च्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. हे सूर्यग्रहण भारताच्या दक्षिण पॅसिफिक महासागरातून दिसेल. Hybrid solar eclipse

कंकणाकृती ग्रहनाला तिथूनच सुरवात होईल. पुढे पाश्चिम आस्ट्रेलियाच्या एक्समाउथ ह्या ठिकाणी पापुआंगिनी, इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलीप्पिनस ह्या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

ग्रहणाच्या सुरवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल तर मध्य काळात हे ग्रहन खग्रास दिसेल ,एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे ह्याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात .दर दशकातून एखादे वेळेसच असे दुर्मिळ हायब्रीड सूर्य ग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ ३ % असते.

ग्रहणाच्या वेळा – हे ग्रहण भारतीय वेळेनुसार ०७.०४.२६ ( UTC- ०१.३४.२६ ) वाजता सकाळी सुरु होईल. खग्रास स्थिती ०९.४६.५३ वाजता तर १२.२९.२२ वा ग्रहण समाप्ती होईल. संपूर्ण ग्रहणात खग्रास स्थिती १.१६ मिनिटे असेल, खंडग्रास स्थिती ३ तास असेल तर संपूर्ण ग्रहण ५ तास २४ मिनिटा असेल.हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्रात आणि मेष राषीत घडणार आहे.

ग्रहण कसे घडते – सूर्य चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्र आणि सूर्य ग्रहणे घडत असतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी च्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सुर्य् ग्रहणे आणि जेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी येते तेव्हा चन्द्रग्रहने होत असतात .सूर्य आणि पृथ्वी ह्याच्या मधून चंद्र भ्रमण करताना ५ डिग्रीच्या कोनाने फिरतो त्यामुळे चंद्र- सूर्य ग्रहणे नियमित होत नाही. केवळ चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी च्या एका रेषेत येतो त्याच वेळेस ग्रहणे होत असतात.

सूर्य ग्रहणाचे प्रकार – सूर्य ग्रहणाचे साधारणता खंडग्रास,खग्रास आणि कंकणाकृती असे ३ प्रकार मानले जातात,परंतु क्वचित घडणारे हायब्रीड सुर्य् ग्रहण हा सुद्धा ४ था प्रकार मानल्या जातो. खंडग्रास ग्रहणात चंद्र हा सूर्याच्या बिंबाला पूर्णपणे झाकत नाही,खग्रास ग्रहणात मात्र चंद्रामुळे सूर्याचे बिंब पूर्णपणे झाकल्या जाते. कंकणाकृती सूर्य ग्रहनावेळी चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर थोडे जास्त असते त्यामुळे सूर्य बिंब पूर्णपणे झाकल्या जात नाही. ह्या स्थितीत सूर्याचे बाह्य बिंब हे कंकणाकृती दिसते.

हायब्रीड सूर्यग्रहण कसे घडते ? हायब्रीड सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ अवकाशीय घटना आहे.एखाद्या दशकात आखादे वेळी घडणारी ही घटना असते. पृथ्वी च्या गोल आकारामुळे आणि पृथ्वी वरील कमी अधिक उंची / अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पहावयास मिळते .बहुदा जिथे सूर्य ग्रहण सुर्योदयावेळी आणि समुद्रातून दिसते तेव्हा ही शक्यता असते. समुद्र आणि जमीन ह्यातील उंची मुळे सुद्धा हायब्रीड सूर्यग्रहण दिसते.

२० एप्रिल रोजी होणारे सूर्य ग्रहण सकाळी होत आहे ,त्यामुळे सुरवातीला आणि शेवटी कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसेल तर सूर्य जेव्हा वर येईल तिथून ते खग्रास ग्रहण दिसेल.विशेष म्हणजे २० एप्रिल चे कंकणाकृती सूर्य ग्रहण पेसिफिक महासागरातून दिसेल तर खग्रास ग्रहण ऑष्ट्रेलीया,इंडोनेसिया येथून दिसेल.

ग्रहणाचे वैद्न्यानिक महत्व- ग्रहण ही. एक नैसर्गिक खगोलीय घटना असून अशी ग्रहणे सूर्यमालेत दररोज होत असतात.परंतु ग्रहणामुळे अनेक वैद्न्यानिक सत्य शोधण्याची आणि अनुभवण्याची संधी असते.खर तर ग्रहणे ह्या सावल्यांचा खेळ आहे,परंतु ह्या निमित्ताने सूर्य,चंद्र पृथ्वी केव्हा आणि कशी एका रेषेत येतात हे कळते,सूर्य-चंद्र एका रेषेत आल्यास गुरुत्व बलाचा किती परिणाम होतो हे अभ्यासता येते , खग्रास स्थितीत सूर्याचा कोरोना ,सौरज्वाळा ह्याचा अभ्यास करता येतो, ताऱ्याची स्थिती आणि प्रकाष किरणांची वक्रता अभ्यासता येते. विशेषता सूर्यग्रहणाचा खरोखर मानवावर,सजीवावर शारीरिक,मानसिक परिणाम होतो का ह्याची पडताळली / शोध करण्याची ही संधी असते.

अचानक होणार्‍या अंधारामुळे सजीव कसे वागतात ह्याचा अभ्यास करण्याची पण संधी असते. आपल्याकडे २० एप्रिलला ग्रहण दिसत नसल्याने ही संधी आपल्याकडे नाही ,मात्र पुढील ग्रहनावेळी मात्र हे प्रयोग करावे.
भारतातून २०२३ मध्ये दिसणारी ग्रहणे- २०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत त्यात २ चंद्र तर २ सूर्य ग्रहणे आहेत.१) २० एप्रिल- हायब्रीड सूर्य ग्रहण ,हे भारतातून दिसणार नाही २) ५-६ मे छाया कल्प चंद्रग्रहण-हे भारतातून दिसेल ३)१४ ऑक्टोबर कान्कनाकृती सूर्यग्रहण – हे सुद्धा भारतातून दिसणार नाही.४)२८-२९ ऑक्टो .खंडग्रास चंद्रग्रहण- हे ग्रहण भारतातून दिसेल.म्हणजे ह्या वर्षी भारत्तातून केवळ २ चन्द्रग्रहनेच दिसतील कोणतेही सूर्यग्रहण दिसणार नाही.

अंधश्रद्धा बाळगू नये- ग्रहणे ही खर तर सावल्यांचा खेळ आहे,परंतु प्राचीन भारतात आणि जगातील काही देशात ज्योतिष अभ्यासक मात्र राशी,नक्षत्र आणि ग्राहनांचा प्रभाव मानवावर पडतो असे मानतात.अजून तरी हा परिणाम कसा होतो हे ते सिद्ध करू शकले नाहीत.

विज्ञान मात्र ह्या कपोल कल्पित बाबी आहेत असेच मानते. दररोज होणारी रात्र हा पण एकप्रकारे ग्रहनाचाच प्रकार असतो,ग्रहणात तर केवळ थोडेच मीनिटे अंधार पडतो,पशु -पक्षांना ग्रह,राशी-भविष्याचा जर काही फरक पडत नाही तर केवळ माणसांनाच का ? कांरण हे सर्व आपण निर्माण केलेले तर्क वितर्क आहेत. जो पर्यंत विज्ञानाच्या आधारे आपण सिद्ध करू शकत नाही तो पर्यंत तरी ह्या अंधश्रद्धा च आहेत. त्यामुळे सर्व लहान मोठे सर्वांनी अश्या खगोलीय घटनांचा आनंद घ्यावा असे आवाहन स्काय वाच ग्रुप तर्फे करण्यात येते .

bottom