कोरपना येथे आंबेडकरी जलसा कार्यक्रम संपन्न

आंबेडकरी जलसा

183

News34 chandrapur

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून १४ आणि १५ एप्रिल 2023 रोजी व्याख्यानमाला व आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भवनात वाचनालयाची अत्यंत गरज असल्याने खास वाचनालयाचा मदती करता कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.

बहुजन समाजा समोरील आवाहने व उपाय या विषयावर मा.श्रावण देवरे साहेब नाशिक राष्ट्रीय ओबीसी परिषद समनयवक,दिनेश पारखी मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष राजुरा, प्रा.हेमचंद्रजी दुधगवडी सर गडचांदुर, शंतनु कांबळे जिवती,दीक्षा वागमारे अंतरगाव यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला गावातील मेघा पेंदोर सरपंच नांदा, पूरुशोतमजी अस्वले उपसरपंच नांदा,रत्नाकरजी चटप सदस्य,प्ररकश बोरकरजी सदस्य,पूरुशोतमजी निब्राड सर नांदा,सचिन बोडाले सर नांदा,निलेश भाऊ ताजने सामाजिक कार्यकर्ता यांची उपस्थिती होती. शांती कॉलनी ते बुद्ध विहार पर्यंत अशी जल्लोषात धम्म रॅली कडण्यात आली.

दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला भंते आनंद यांचा धम्मा देस्ना पर पडले व भारतीय संविधान बहुजन मुक्तीचा जाहीरनामा या विषय वर मा.डॉ प्रेमकुमार खोब्रागडे सर सिंदेवाही, कविता गेडाम राजुरा यांनी मार्गदर्शन केले.या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम मधे शांती कॉलनीतील महिलांनी भाग घेतला होता त्यामधे विविध कार्यक्रम आयोजित केले होते व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक भूषण कातकर वणी,जयाताई बोरकर चिमूर व जीवन टिपले हिरापुर यांचा आंबेडकरी जलसा चे आयोजन केलं होत.

या कार्यक्रमाचं संचालन प्रणय निमस्टकर व आभार कनिष्क ताकसांडे यांनी म्हणाले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष कनिष्क ताकसांडे, समितीचे सिध्दार्थ करमरकर, कैलास ताकसांडे, सचिन जुलमे, रूपेश अलोने,मंगेश पाझारे व बुजाळेजी यांनी परिश्रम घेतले आहे.

bottom