14 एप्रिलला विदर्भात येणार “बबली”

14 एप्रिलला बबली चित्रपटाचे प्रदर्शन

1024

News34 chandrapur

चंद्रपूर – विदर्भात चित्रित करण्यात आलेला मराठी चित्रपट बबली 14 एप्रिलला जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

 

तरुण-तरुणीच्या आजच्या जीवनशैलीवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून नागपुरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर गगन गजलवार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून मुंबई मधील अभिनेत्री मानसी सुभाष ने टायटल भूमिका निभावली आहे.

 

विशेष बाब म्हणजे 40 कलाकार असलेल्या या चित्रपटात 39 कलाकार हे विदर्भातले, चित्रपटाचे 90 टक्के शूट हे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व अलिबाग येथे करण्यात आले आहे.
चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील विवान वैध ने सहायक अभिनेत्याची भूमिका निभावली आहे.
यासह वर्धा अनिरुद्ध चोथमल, निलेश ददगाल सह इतर कलाकार या चित्रपटात झळकणार आहे.
येत्या 14 एप्रिलला विदर्भातील 30 ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते सतीश समुद्रे यांनी दिली आहे.
सध्या या चित्रपटाचे टायटल song youtube वर चांगलेच व्हायरल झाले आहे.
तर मग प्रेक्षकांनो वैदर्भीय भाषेत असलेला हा चित्रपट बघायला विसरू नका.

bottom