चंद्रपुरात घडली दुर्दैवी घटना

चंद्रपुरात घडली दुर्दैवी घटना

2244

News34 chandrapur

 

चंद्रपूर: शहरातील डॉ. आंबेडकर नगर प्रभागातील बाबुपेठ येथील सिध्दार्थ नगर येथे जंगलातून वाहत येणाऱ्या नाल्याच्या खड्ड्यात पोहण्या करीता गेलेल्या 3 मुलांपैकी एका 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 15 एप्रिलला दुपारी 3 वाजता घडली. त्या मुलाचे नाव सावन हिवरकर असे आहे .या घटनेबाबत स्थानिक लोकांनी आपचे शहर सचिव राजू कूडे यांना याबाबत सूचना दिली असता त्यांनी रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू असून 4 तासानंतरही मृतदेह शोधण्यास पोलिस प्रशासनाला यश आले नव्हते. death by drowning

या ठिकाणी या पूर्वी देखील 2 तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरहु परिसर वनविभागाच्या आणि महानगरपालिकेच्या हद्दीला लागून आहे. उपरोक्त नाला हा 12 ही महिने वाहत असून या ठिकाणी येथील नागरिक कपडे धुण्याकरिता नेहमीच येत असतात, याच नाल्याला लागून पुढे स्मशानभूमी असून स्मशानभूमी व या नाल्याचे सौंदर्यींकरण करण्याकरिता महानगरपालिका कडे आम आदमी पार्टीने वारंवार निवेदने दिली होती.

त्यानंतर केवळ वॉलकम्पाऊंड करिता (फक्त 1 कोटीचा )निधी देण्यात आला, मनपा प्रशासन दलित प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हे मनपा प्रशासन दलित विरोधी असल्याचा आरोप आपचे शहर सचिव राजू कूडे यांनी प्रशासनावर केलेला असून मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी या वेळी केलेली आहे. घटना स्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली असून हे वृत्त लिहीपर्यत टीमची शोध मोहिम जारी होती.

bottom