राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बकुळ धवने ठरली सर्वोत्कृष्ट रौप्यपदकाची मानकरी

चंद्रपूरच्या बकुळ धवनेची उंच भरारी

434

News34 chandrapur

चंद्रपूर – सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित ६१ व्या हौशी अंतिम मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. वृंदावन या इरफान मुजावर लिखित नाटकातील आरिश या भूमिकेसाठी कु बकुळ धवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्यपदक जाहीर झाले. Best actresses

 

खडतर प्रवास अनुभवलेल्या वृंदावन ने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांकासह ७, कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांकासह ५ आणि कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यात दुसरे येण्याचा मान पटकावत ६ एकूण १९ पारितोषिके पटकावली आहेत. Workers State Theater Competition

 

वृंदावन च्या संपूर्ण चमूचे परिश्रम अतिशय महत्वाचे आहे. नाटकाचे लेखक इरफान मुजावर यांचे असून दिग्दर्शन बकुळ धवने हिचे आहे. प्रकाशयोजना हेमंत गुहे , नेपथ्य तेजराज चिकटवार ,पंकज नवघरे , संगीत लिलेश बरदाळकर, रंगभूषा व वेषभूषा मेघना शिंगरू यांची आहे .या नाटकात नूतन धवने , रोहिणी उईके , बबिता उईके, अश्विनी खोब्रागडे , पंकज मलिक , तुषार चहारे , मानसी उईके , वैशाख रामटेके, आरती राजगडकर , माधुरी वासेकर , माधुरी गजपुरे , आशा बॅनर्जी , रोशन बघेल, रवींद्र वांढरे, सुरज उमाटे , ज्योत्स्ना निमगडे ,समृद्धी कांबळे , अंकुश राजूरकर आदींनी भूमिका अभिनित केल्या आहेत.

बकुळ धवने हिचे राज्य नाट्य स्पर्धेतील हे सहावे रौप्यपदक आहे हे विशेष .

bottom