आंबेडकर जयंती मिरवणुकीत मोठी दुर्घटना

मोठी दुर्घटना

1850

News34 chandrapur

विरार – देशात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वि जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे, मात्र जयंतीच्या पूर्व संध्येला मुंबई मधील विरार येथे आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडल्याने 2 युवकांचा मृत्यू झाला.

13 एप्रिलला विरार मधील कारगिल नगरातील बौद्धजन पंचायत समितीतर्फे बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, रात्री साडे दहा च्या सुमारास मिरवणूकीचे समापन झाल्यावर नागरिक घरी परतत होते.

परत असताना काही युवक मिरवणुकीच्या वाहनावर उभे होते, वाहनावर असलेल्या लोखंडी रॉड ला विजेच्या रोहित्रांचा स्पर्श झाला, त्यामुळे विजप्रवाहाचा जोरदार धक्का 30 वर्षीय रुपेश सुर्वे व 23 वर्षीय सुमित सूत यांना बसला, या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 18 वर्षीय उमेश कनोजिया, 18 वर्षीय राहुल जगताप, 23 वर्षीय सत्यनारायण हे गंभीर जखमी झाले.

दुर्घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती, पुढील तपास विरार पोलीस करीत आहे.

bottom