शिक्षकांच्या समस्या निवारणार्थ आमदार अडबाले यांचं मोठं पाऊल

आमदार अडबाले यांचं मोठं पाऊल

518

News34 chandrapur

 

चंद्रपूर : प्राथमिक, माध्यमिक व उच्‍च माध्यमिक विभागातील मान. शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), जिल्‍हा परिषद यांच्याकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या संकल्‍पनेतून ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्‍च माध्यमिक विभागातील अनेक समस्‍या/प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून श्री. सुधाकर अडबाले निवडून आल्‍यानंतर शिक्षकांच्या या प्रलंबित असलेल्‍या समस्‍या मार्गी लावण्यासाठी नागपूर विभागातील जिल्‍हानिहाय हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथमतः चंद्रपूर जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. Mlc sudhakar adbale

चंद्रपूर जिल्‍हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांच्याकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांची माहिती माननीय आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या नावाने थोडक्‍यात अर्ज लिहून 9284723492, 9850323845 या व्‍हॉट्‌सॲप नंबरवर अर्ज व इतर माहिती ३ मे २०२३ पर्यंत पाठवावी. Zilla parishad chandrapur

त्‍यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या समस्‍या निकाली काढण्यात येईल. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील ज्‍यांच्या समस्‍या प्रलंबित असतील त्‍यांनी आपले अर्ज लवकरात लवकर पाठवावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले आहे.

bottom