चंद्रपुरात युवक पुलाखाली कोसळला

अपघाताचा ब्लॅक स्पॉट

1758

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील राजीव गांधी मार्गावर स्थित बाबूपेठ उड्डाणपुलावर अपघाताची मालिका सुरू असून 11 एप्रिलला रात्री पुन्हा पुलावर अपघात झाला. Fatal accident

या अपघातात दुचाकी चालक युवक पुलाच्या खाली पडला असल्याची माहिती आहे, बाबूपेठ बायपास चा हा पूल अपघाताचा black spot ठरत आहे.

मागील वर्षीपासून या पुलावर अपघाताचे सत्र सुरू झाले होते, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहन भरधाव वेगात येतात पुलावर धोकादायक वळण आहे, अपघातामुळे वळणावर तब्बल 4 ठिकाणी रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहे. Railway over bridge

news34 accident
Accident babu peth railway over bridges

अपघाताच्या घटनेला सुरुवात झाल्यावर सुद्धा त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याचे सौहाद्र दाखविले नाही, 11 एप्रिलला रात्री 8 वाजताच्या सुमारास 2 युवक आपल्या दुचाकी वाहनाने जात होते, वाहन वेगात असल्याने त्या वळणावर दुचाकी अनियंत्रित झाली, मात्र दुचाकी चालकाने वेळीच ब्रेक मारला पण मागे बसलेला युवक पुलाखाली कोसळला अशी माहिती मिळाली आहे.

त्या युवकाला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सध्यातरी ते युवक कोण? ते खरंच खाली कोसळले काय? याबाबत अजूनही अधिकृत वृत्त हाती आले नाही.

 

bottom