चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात 3 तासात 3 चोऱ्या

चोरांची हात सफाई

758

News34 chandrapur

चंद्रपूर/ कोरपना – एकाचं रात्री एक दुकान व दोन घरून चोरट्यांनी विविध वस्तू लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली. पहिल्या घटनेत मेन रोड वरील डायमंड ज्वेलर्स येथील शटरचे लॉक कटर च्या सह्ययाने तोडून ज्वेलर्स मधील वेगवेगळे चांदीचे जोडवे, चाळ, पैजन, बीचवे आदी वस्तू अंदाजे किंमत ४६ हजार रुपये लंपास केले. याची तक्रार ज्वेलर्स मालक अब्दुल मोहम्मद यांनी दाखल केली आहे. Chandrapur crime

दुसऱ्या घटनेत कोरपना येथील वामन मेश्राम यांच्या घरच्यां अंगणातून एम एच ३४ सी सी ५६४५ क्रमांकाची शाईन गाडी अंदाजे किंमत ८० हजार चोरट्यानी लंपास केली. तिसऱ्या घटनेत कोरपना येथील पाण्याच्या टाकीजवळ वास्तव्य असलेले पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत कर्मचारी ज्ञानेश्वर भुसारी यांच्या घरची एमआय ची फ्लॅट Led टीवी अंदाजे किंमत १० हजार रुपये व रोख सतरा हजार रुपये ची रक्कम लंपास केली. Chandrapur burglary

या सर्व घटना एकाच दिवशी बारा ते तीन या तीन तासा दरम्यान तीन चोरीच्या घटना घडल्याने कोरपनात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय शुक्ला, अमर राठोड व कोरपना पोलीस करीत आहे.

bottom