चंद्रपूरकरांच्या पोटात नकली दारू?

चंद्रपुर शहरात 25 वर्षीय युवकाने सुरू केला बनावट दारूचा कारखाना

3308

News34 chandrapur

 

चंद्रपूर – शहरातील अवैध दारू विक्रीसाठी प्रसिद्ध असलेला कंजर मोहल्ला, या भागात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री व बनावट दारूची विक्री होते, अनेकदा पोलिसांनी या भागात कारवाई सुद्धा केली मात्र आजपर्यंत सदर दारू ची विक्री थांबावी यावर ठोस कारवाई मात्र झाली नाही. fake alcohol

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यावर या भागात दररोज लाखोंची दारूविक्री सुरू होती, आजही Dry day ला या भागात सहज दारू उपलब्ध होते. Chandrapur crime branch

दारूबंदी उठल्यावर जिल्ह्यात अनेक भागात बनावट दारू विक्री सुरू होती, उत्पादन शुल्क विभागाने अनेकदा कारवाई केली, मात्र आता शहरातील कंजर मोहल्ला येथे 25 वर्षीय युवकाने चक्क बनावट दारू चा कारखाना सुरू केला, यामध्ये मध्यप्रदेश राज्यातून चंद्रपुरात दारू आणत त्यामध्ये नशा करणारे द्रव्य टाकून त्यावर बनावट लेबल लावत दारूविक्री सुरू होती. Fake liquor factory in chandrapur

याबाबत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला 21 एप्रिल रोजी माहिती मिळताच त्यांनी कंजर मोहल्ला येथील रवींद्र उर्फ बिट्टू रणधीर कंजर यांच्या घरी धाड मारली असता रविंद्र हा घराच्या मागे जात पळून गेला.
पोलिसांनी रविंद्र च्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये Royal Stag deluxe Whiskey च्या बॉटल मध्ये मध्यप्रदेश राज्यातून आणलेली दारू टाकत त्यामध्ये नशा करणारे द्रव्य मिक्स करण्याचे साहित्य स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले.

रिकाम्या बॉटल, बुच, मध्यप्रदेश राज्यातील छापील Officers choice च्या बॉटल, कटर, प्लास्टिक ची चाळी, नशा येणारे द्रव्य असा एकूण 31 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी आरोपी रवींद्र कंजर वर कलम 420, 328 भांदवी सहकलम 65(अ), 65(ब), 65(ड), 65(ई), 65 (फ), 67, 67 (1)(अ), 67(क), 108 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 63 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षकरविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि मंगेश भोयर, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, नितीन रायपूरे, कुंदनसिग बावरी, रवींद्र पंधरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले, प्रांजल झिलपे व चंद्रशेखर आसुटकर यांनी केली.

bottom