खलिस्तानी समर्थक अमृतपाल ला अटक

अमृत पाल ला अटक

739

News34 chandrapur

पंजाब – मागील 36 दिवसांपासून फरार असलेल्या खलिस्तानी समर्थक दे वारसा संघटनेचा प्रमुख Amritpal singh ला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

अमृतपाल सिंह याला मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार अमृतपाल याच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई करून त्याला आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यात रवाना करण्याची तयारी सुरू आहे.

पंजाब पोलीस आणि भारतीय संरक्षण यंत्रणाकडून प्रयत्न सुरू होते. अमृतपाल याला पकडण्यासाठी नेपाळ बॉर्डरपर्यंत सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. Khalistani samarthak

आपल्या समर्थकांच्या सुटकेसाठी अमृतपाल ने 23 फेब्रुवारीला पंजाब मधील अजनाळा पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता, त्या घटनेनंतर अमृतपाल पसार झाला होता.

 

bottom