राज्यातील नागरिकांना आजपासून वीज दरवाढीचा शॉक

आजपासून विजेचे दर महागले

680

News34 chandrapur

मुंबई – राज्यातील जनता आधीच वाढत असलेल्या महागाईने त्रस्त आहे, त्यात आता महावितरणने नागरिकांच्या अडचणीत वाढ करीत 1 एप्रिल पासून घरगुती वीज दरात तब्बल 6 टक्क्यांनी दरवाढ केली आहे. Mahavitran price hike

 

सामान्य नागरिकांसाठी हा महावितरणने दिलेला मोठा धक्का असून, या दरवाढी विरोधात केवळ आम आदमी पक्षाने आवाज उचलत विरोध केला होता.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी लिमिटेड, अदानी, बेस्ट व टाटा पावर ने सुद्धा दरवाढ लागू केली आहे, त्यासाठी आर्थीक तोट्याचे कारण समोर करीत ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली.

 

याआधी महावितरणने वर्ष 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के, 2024-25 मध्ये 5.9 टक्के, घरगुती विजेच्या दरात 6 टक्के, 2024-25 साठी सुद्धा 6 टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.

 

 

bottom