चंद्रपूर/ मागील 4 दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्याने धुमाकूळ माजविला आहे, या वादळी वाऱ्याचा मोठा फटका 25 एप्रिलला भारतीय रेल्वे वर झाला. Indian railways
वरोराजवळ रेल्वेच्या विद्युत वाहिनीच्या हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायर तुटल्याने दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे तब्बल 3 तास उशिरा चालत आहे. High voltage overhead wire
वरोरा रेल्वे स्थानकापासून अवघ्या 3 किमी अंतरावर रेल्वे खांब क्र. 832 बी जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरून चंद्रपूरकडे येणारी गाडी क्र. 12792 दानापूर_सिकंदराबाद गाडी दुपारी 3.15 वाजता थांबली. आणि ही गाडी थांबल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्या क्र. 12655 अहमदाबाद ते महाबलीपुरम नवजीवन एक्स्प्रेस आणि इतर दोन गाड्या मध्यावर थांबवाव्या लागल्या. माहिती मिळताच रेल्वे तंत्रज्ञांचे पथक पोहोचले आणि वायरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. सायंकाळी उशिरा 5.42 वाजता हे काम पूर्ण करून गाडी पुढे रवाना करण्यात आली. Express railways
वादळी वाऱ्यामुळे तब्बल 1 किलोमीटर (माजरी-वरोरा पर्यंत) इतक्या अंतराची विद्युत वाहिनी तुटली होती, यामुळे सध्या दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या तब्बल 3 तास उशिरा चालत आहे. Breaking news
दरम्यान, उष्मा आणि उकाड्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रवासी ट्रेनमधून उतरून रुळाजवळ जमा झाले. आणि ट्रेन सुरू होण्याची वाट पाहत होते. उन्हामुळे वृद्ध, महिला, लहान मुलांची अवस्था दयनीय झाली होती. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सायंकाळी उशिरा गाड्यांची वाहतूक सुरू झाली होती. मात्र रेल्वे विभागाकडून रेल्वेच्या स्पेशल इंजिनच्या मदतीने गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली.