चंद्रपुर जिल्ह्यात भीषण अपघात

लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटले

1653

News34 chandrapur

 

सिंदेवाही: पळसगाव (चिखलगाव) नजीक लग्नाच्या वरातीला घेवून जाणाऱ्या ट्रैवल्स चा मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात अंदाजे १४ वराती जखमी झाले. ही घटना रविवार दि. २३ एप्रिल च्या संध्याकाळी तीन ते चार वाजता दरम्यान घडली. Travels’ tire burst

चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारी चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स व ट्रक च्या धडकेत 5 प्रवासी जखमी झाले होते, दुसरी घटना सिंदेवाही येथे लग्नाची वरात घेऊन जात असताना ट्रॅव्हल्स चा मागील टायर फुटल्याने अपघात झाला, यामध्ये तब्बल 14 प्रवासी जखमी झाले.

Wedding travels accident

सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नाचे कार्यक्रम आटपुन नागभीड़ तालुक्यातील नांदगांव येथे Travels ने जात असतांना पळसगाव (जाट) नजीकच्या नदीसमोर ट्रैवल्सचा मागील टायर फुटल्याने चालकाचे गाड़ीवरुन नियंत्रण सुटल्याने ट्रैवल्स रस्त्याच्या कड़ेला पलटली. सदर ट्रैवल्समध्ये अंदाजे ३५ वराड़ी होते. Chandrapur road accident

जखमीमध्ये वारलू कचरू मेश्राम (६०), प्रभाकर गेडाम (५२), शंकर ठाकरे (५०), सदानंद ठाकरे (१७), मयूर गुळधे (२१), आत्माराम निमगड़े (६५), लोकनाथ डोंगरवार (५२), भागवत गजभे (७५), प्रकाश मेश्राम (५५), ऋषिजी चांदेकर (४५), श्रीधर चांदेकर (४७), नागेश्वर चौके (२४), प्रफुल दडमल (२४), नितेश गजभे (११) सदर वराड़ी हे सावरगांव, नांदगांव, तुकुम व चिखलगाव येथील आहेत. अपघातग्रस्त नागरिकांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त स्थळ हे तळोधी पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुढील तपास तळोधी पोलीस करीत आहे.

bottom