वाघोली गावात जेव्हा वाघ आला

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

1030

News34 chandrapur

व्याहाड बुज/सावली – वाघोली बुट्टी येथील 65 वर्षीय महिला मोमता हरिश्चंद्र बोदलकर ही आपल्या शेतात काम करीत असताना अचानक वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज 26 एप्रिलला घडली.

Chandrapur tiger attack
सदर घटनेची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. महिलेला ठार केल्यानतर वाघ त्याचठिकाणी दबा धरून बसला होता. काही वेळात गर्दीतल्या लोकांवर चवताडून आल्याने गोवर्धन नामक व्यक्तीचा पायाला जबर दुखापत झाली. Tiger attack

वाघाने महिलेला ठार केल्याची माहिती वनविभागाला कळताच वनविभाग व पोलीसाचा ताफा घटनास्थळी हजर झाला. मौका पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह सावली येथील आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम करिता रवाना केला.

bottom