चंद्रपुर जिल्हा बाजार समिती निवडणुकीचे निकाल जाहीर

APMC ELECTION RESULT 2023

1500

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात यंदा 12 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 9 बाजार समितीमध्ये 28 एप्रिलला मतदान पार पडले, 29 एप्रिलला सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये अनेक धक्कादायक निकाल पुढे आले आहे. 9 बाजार समिती च्या निकालात कांग्रेस भाजप आघाडी ने 2 (चंद्रपूर व राजुरा), कोरपना 1, ब्रह्मपुरी 1, सिंदेवाही 1, मूल 1, चिमूर भाजप 1, नागभीड भाजप 1 व वरोरा बाजार समितीच्या निकालात कांग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व मनसे गटाला 9, खासदार धानोरकर गटाला 8 व शिंदे गटाला एका जागेवर विजय मिळाला.  APMC Election 2023
बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप व कांग्रेस पुरस्कृत पॅनल यांच्यामध्ये खरी लढत होणार असे चित्र होते, मात्र देशात कांग्रेस व भाजप हे अलग विचारधारेचे पक्ष असले तरी चंद्रपुर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत भाजप व कांग्रेसच्या पॅनल ने एकत्र येत निवडणूक लढली.   Chandrapur election result
मूल बाजार समिती च्या निवडणुकीत कांग्रेस विरुद्ध कांग्रेस असे चित्र होते, कांग्रेस खासदार बाळू धानोरकर विरुद्ध माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार व सिडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यात मुख्य लढत झाली, या लढतीमध्ये विजय वडेट्टीवार व संतोष रावत यांनी बाजी मारत कांग्रेस पुरस्कृत पॅनल ने 18 पैकी 17 जागेवर विजय मिळविला तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळविला.
चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत भाजप व कांग्रेस ने आघाडी करीत 12 जागेवर विजय मिळवला तर खासदार धानोरकर चोखारे गटाला 6 जागेवर समाधान मानावे लागले.
राजूरा बाजार समिती – कांग्रेस भाजप आघाडी 15, शेतकरी संघटना 3
कोरपना बाजार समिती – 13 कांग्रेस, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी 5, भाजप -0
ब्रह्मपुरी बाजार समिती – कांग्रेस 14, भाजप 4
सिंदेवाही बाजार समिती – कांग्रेस 11, भाजप 7,
चिमूर – भाजप 17, कांग्रेस 1
नागभीड – भाजप 14, कांग्रेस 4
वरोरा बाजार समिती मतमोजणी प्रक्रिया लांबल्याने उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.वरोरा बाजार समिती भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी व मनसे गटाला 9 तर कांग्रेस खासदार बाळू धानोरकर गटाला 8 व शिंदे गटाला 1  जागा जिंकता आली.
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा कांग्रेस व भाजपाने एकत्र येत निवडणूक लढली व 2 बाजार समित्यांवर विजय मिळविला त्यासोबत कांग्रेसचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर एकमेकांच्या विरोधात लढले मात्र या लढतीत खासदार बाळू धानोरकर यांना पराभव स्वीकारावा लागला हे विशेष.
एकंदरीत या निवडणुकीत कांग्रेसची सरशी तर भाजपची पीछेहाट झाली आहे. कांग्रेसला 4 जागेवर स्पष्ट बहुमत तर भाजपला 2 जागेवर स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. Apmc election result
30 एप्रिलला उर्वरित 3 पोम्भूर्णा, गोंडपीपरी व भद्रावती तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक होणार असून सायंकाळी मतमोजणी होणार आहे.
bottom