चंद्रपूर वनविभागाच्या हाती लागली आंतरराज्यीय टोळी

सततचा पाठलाग आणि वनविभागाला मिळाले यश

2233

News34 chandrapur

चंद्रपूर / राजुरा – चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, देशात सर्वात जास्त वाघांची संख्या ताडोबा व्याघ्रप्रकल्प मध्ये आहे, मात्र जंगलातील भाग कमी पडत असल्याने वाघ गाव शहरात धूम ठोकत आहे.
Tiger skin smuggling
त्यामुळे वाघांच्या शिकारीचे प्रमाणही वाढले, वाघाच्या कातडीची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी चंद्रपूर जिल्ह्यात येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती, माहितीच्या आधारे वनविभागाने जिवती तालुक्यातील पाटागूडा भागात सापळा रचला.
त्यानुसार वनविभागाने त्या टोळीमधील 6 जणांना अटक केली, मागील अनेक महिन्यापासून ही टोळी वनविभागाला चकवीत होती.
चंद्रपूर वनविभाग 2 महिन्यापासून या टोळीच्या मागावर होता, आरोपिकडून 1 वाघाची कातडी जप्त करण्यात आली, सदर कातडीची तस्करी जिवती तालुक्यात करण्याच्या उद्देशाने आरोपी आले असल्याची माहीती आहे.
सदर वाघाची कातडी ही तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जवळ वाघाची असल्याची आरोपीनी माहिती दिली, त्या वाघाची शिकार करीत ही कातडी महाराष्ट्र राज्यात आणली. या गुन्ह्यात अजून काही आरोपींचा सहभाग आहे काय याबाबत पुढील तपास सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मुख्य वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक मध्य चांदा श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे करीत आहेत. यावेळी एस व्ही सावसागडे, अनंत राखुंडे, के बी कडकाडे, डी ए राऊत, वनरक्षक संतोष आलाम, संजय गरमाडे, प्रदीप मरापे, बालाजी बिंगेवाड यांनी मोलाचे कार्य केले.
bottom