चंद्रपूरकरांनो या मार्गावरून जात आहात तर सावधान

अपघातप्रवण स्थळ

1641

News34 chandrapur

 

चंद्रपूर : शहरातील बल्लारशा मार्गे शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावरील बाबूपेठ मधील लालपेठ येथील रेल्वे उड्डाणपूल हा सध्या अपघाताचा स्पॉट बनलेला आहे. या ठिकाणी मागील काही महिन्यात अनेक अपघात झालेले असून यात अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व पत्करावे लागले आहे. या ब्रिज वरती वळण घेते वेळी दोन्ही बाजूने लोखंडी पाईपची रेलिंग बनवलेली आहे. Accident black spot

चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लोखंडी पाईप ची रेलिंग तुटून खाली कोसळल्याचे अनेक घटना घडत असल्याचे निष्पन्नास आलेले आहे. या वळणावरती काँक्रेटची भिंत उभारण्याची मागणी आप चे राजु कुडे तसेच येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली असताना सुद्धा याकडे प्रशासनाने पाठ फिरवलेली आहे. Bridge relling

ज्या ठिकाणी अपघात होऊन रेलिंग तुटलेली आहे त्याच्या दुरुस्ती चे काम सुध्दा अजून पर्यंत न झाल्याने ब्रिजचे तुटलेली रेलिंग ही अपघातांना आमंत्रण देत आहे. भविष्यात या ठिकाणी मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता असून शासकीय बांधकाम विभाग, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि डब्लू सी एल प्रशासन झोपेचं सोंग करत असल्याचे आरोप राजु कुडे यांनी केले आहे.

bottom