शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणतात…

शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची सावध भूमिका

926

News34 chandrapur

चंद्रपूर – 12 एप्रिलला चंद्रपुरात युवक कांग्रेसच्या आंदोलनानंतर युवक कांग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करीत त्यांच्या विचारांवर भाष्य करीत नवा वाद निर्माण केला.

त्या भाषणाचा व्हिडीओ स्वतः शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर हॅंडल वरून शेअर केला, त्यानंतर त्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटू लागले आहे.

काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार?

शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकर गौरव यात्रेच्या विरोधात बोलताना सावरकर यांनी बलात्काराला राजकीय शस्त्र म्हणून वापरा ते सुद्धा आपल्या राजकीय विरोधकांसाठी.

माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या कन्येने केलेल्या या वक्तव्यानंतर उमटलेल्या वादानंतर विजय वडेट्टीवार यांनी शिवानी यांनी तो संदर्भ सहा सोनेरी पान या पुस्तकातून घेतला आहे.

कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची सावध भूमिका..

सावरकर यांच्या पुस्तकाच्या आधारे शिवानी यांनी सदर वक्तव्य केले आहे, पुस्तकात जर तसे नसेल तर शिवानी चे वक्तव्य चुकीचे आहे, जर पुस्तकात तसा उल्लेख असेल तर ते त्यांचे विचार आहे.

शिवानी कडे सहा सोनेरी पान हे पुस्तक आहे, मी शिवानी ला तिच्या वक्तव्य बाबत पाठिंबा दिला नाही, जर पुस्तकात तसा उल्लेख नसेल तर ते वक्तव्य चुकीचे आहे.

bottom