चंद्रपुरात क्रिकेट बुकीं सक्रिय, 2 हजार रुपयात नवीन आयडी

पुन्हा बुकीं सक्रिय

875

News34 chandrapur

चंद्रपूर – News34 च्या IPL क्रिकेट सट्टेबाजांवर प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्याची दखल घेत सट्टेबाजांवर कारवाई सुरू केली मात्र आजही मुख्य बुकीं अटकेबाहेर आहे.

पोलिसांच्या कारवाईने धास्तावलेले क्रिकेट बुकीं सध्या भूमिगत झाले असून त्यांनी बाहेर राज्यातून चंद्रपुरात नेटवर्क सुरू ठेवले. त्यामुळे आजही स्थानिक गुन्हे शाखा मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यास अपयशी ठरले आहे.

मुख्य बुकीं बाहेर गेल्यावर सुद्धा चंद्रपुरात आजही Cricket ID बनविण्याचे काम सुरू आहे, ते सुद्धा 2 हजार रुपयात यासाठी आकाश नामक मुख्य बुकीं हे काम करीत आहे सध्या ID चे संपूर्ण काम नीरज व संपत करीत आहे.

Phone pay वर 2 हजार रुपये पाठविल्यावर काही वेळात आपल्या नावाची आयडी तयार करीत त्यामध्ये 2 हजार कॉइन क्रेडिट करण्यात येत आहे.
आयडी बनविल्यावर पुढे आयडी धारकाला त्यामध्ये पैसे टाकायचे असल्यास फोन पे चा वापर करावा लागत आहे, हे सर्व व्यवहार ऑनलाइन होत आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आरोपीना सहज पकडू शकते मात्र तसे काही होताना दिसत नाही आहे.

सध्या Nice या आयडी जोमात सुरू असून आता Diamond नावाची सुद्धा आयडी बनविल्या जात आहे.

यामध्ये आकाश सह, वाघमारे, राकेश,  इम्रान, पिपरिकर सध्या हे नेटवर्क चालवीत आहे.

सध्या हा क्रिकेटचा सट्टा चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

वर्धा जिल्ह्यात क्राइम इंटेलिजन्स पथकाचे सपोनि संदीप कापडे यांनी आयडी मार्फत मुख्य बुकीला पकडले मात्र चंद्रपुरात आयडी धारकसह मुख्य बुकीं पोलिसांच्या हातीचं लागला नाही.

मुख्य बुकीं चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागणार काय? की लहान बुकींना अटक करून पोलीस समाधान मानणार आहे.

bottom