चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट सट्टेबाज भूमिगत

चंद्रपूर जिल्हा पोलिसांचे ऑपरेशन क्लिन

922

News34 chandrapur

चंद्रपूर – IPL T20 Cricket चा 16वा हंगाम चंद्रपूर जिल्ह्यातील सट्टेबाजांना आयुष्यभर आठवणीत असणार आहे, कारण या हंगामातील सामने सुरू होताच चंद्रपूर जिल्हा पोलीस दल ऍक्शन मोड मध्ये येत क्रिकेट सट्टेबाजांवर दबंग कारवाईला सुरू केली. Cricket gambling

विशेष म्हणजे यासाठी सुरुवातीपासून क्रिकेट सट्टेबाजी चे वृत्त व माहिती सलग News34 ने उचलून धरल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईला गती दिली.

लाईव्ह सामन्यादरम्यान दररोज यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती, ऑनलाइन जुगार असताना सुद्धा पोलिसांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत क्रिकेट सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त केले. Cricket bookie network

पोलिसांच्या कारवाईने धास्तावून चंद्रपुरातील क्रिकेट सट्टेबाज भूमिगत झाले आहे, पोलिसांनी अवैध जुगाराला चंद्रपूरातून सध्या तरी हद्दपार केले आहे असे म्हणता येईल.

या कारवाईचे संपुर्ण श्रेय जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना जाते.

कारण स्थानिक गुन्हे शाखेने सलग 4 कारवाई करीत बुकिंवर धास्ती निर्माण केली त्यामुळे चंद्रपुरातील सट्टेबाजांना देवदर्शनाला पळावे लागले.

भविष्यात क्रिकेट सट्टेबाजाना अवैध जुगार सुरू करताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल अशी दहशत आता पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीवर निर्माण केली आहे.

bottom