गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

227

News34 chandrapur

चंद्रपूर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न महामानव बोद्धीसत्व ,विश्ववरत्न,महाविद्धवान परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त घुटकाळा वार्ड तुकडोजी महाराज चौक येथे सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूर च्या वतीने शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम तुकडोजी महाराज चौक घुटकाळा वार्ड येथे आयोजन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचाल तर वाचाल या मार्गदर्शक व प्रेरणादायी वाक्याचे अनुसरण करून सामाजिक समता संघर्ष समिती ने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, या कार्यक्रमाचा परिसरातील अनेक गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष इरफान शेख यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता वसंत दिकोंडवार, धीरज तांमगडे,सतीश दिकोंडवार, आशिष मंथनवार, कैलास पुराणकर,संदीप कागदेलवार,सलीम खान,आणि इम्रान परिश्रम घेतले.

bottom