DNR ट्रॅव्हल्सचा पुन्हा अपघात, 5 प्रवासी जखमी

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अपघात

2753

News34 chandrapur

खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक : चालकासह पाच जण जखमी

चंद्रपूर

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ट्रक आणी खाजगी ट्रॅव्हल्सची धडक झाली. ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात चालकासह पाच जण जखमी झालेत. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

चंद्रपूर येथून खाजगी DNR ट्रॅव्हल्स क्रमांक MH34BH7577 नागपूरला निघाली होती. चंद्रपूरच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक MH34AB3840 आणी ट्रॅव्हल्सची नंदोरी टोल नाक्याजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात प्रतीक रवींद्र आलम, अश्विनी शंकर मेश्राम, बसचालक शुभम रमेश पोलपोलवार, अतुल ठाकरे हे प्रवाशी जखमी झालेत.घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीसानी घटनास्थळ गाठले. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारा नंतर जखमीना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय पाठविण्यात आले आहे.

मोठी दुर्घटना टळली…

चंद्रपूर- नागपूर महामार्गावर टोलनाक्याजवळ उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मात्र पुलावरून बस न नेता बसचालकाने पुलाचा खाली असलेल्या मार्गाने बस नेली.आणी यवतमाळ जिल्हातून येणाऱ्या ट्रकला धडकली.केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रवाशाना किरकोळ दुखापत झाली. वरोरा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

bottom