शॉर्ट सर्किट आणि एका क्षणात सार काही संपलं

चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी शोरूम ला भीषण आग

904

News34 chandrapur

 

कोरपना – कोरपना येथील चंद्रपूर महामार्गावरील आदर्श टू व्हीलर गाड्यांच्या हिरो शोरूम ला बुधवारी मध्यरात्री दरम्यान अचानक रित्या भीषण आग लागल्याने संपूर्ण शोरूम मधील साहित्यांची राख रांगोळी झाली. यात शोरूमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. Two wheeler show room

मध्यरात्री दरम्यान लागलेल्या आगीत शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या, टू व्हीलर चे ॲक्सेसरीज, शोरूमची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक आदी साहित्य पूर्णत जळून खाक झाले. त्यामुळे शोरूमचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किट की नेमकी अन्य कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. Huge fire

शोरूम ला लागलेल्या आगीवर अग्निशामक माध्यमातून आग विजवण्यात यश आले आहे. हे शोरुम कोरपना येथील सुहेल आबिद अली यांच्या मालकीचे आहे.

bottom