शाळेच्या उन्हाळी सुट्ट्याबाबत महत्वाची माहिती

शाळेच्या सुट्ट्या

1460

News34 chandrapur

चंद्रपूर – एप्रिल महिन्याखेरीस राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार असून शाळा सुरू कधी होणार याबाबत संभ्रम होता, मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनातून काढत शाळा कधी सुरू होणार हे जाहीर केलं. Summer vacation school

 

यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. High temprature

सध्या राज्यात तापमान उच्चांक गाठत आहे, सर्वात जास्त तापमान हे विदर्भात वाढत आहे, विद्यार्थ्यांना लवकर शाळा सुरू करून उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार नाही अशी माहिती केसरकर यांनी देत शाळांच्या सुट्ट्याबाबत माहिती दिली.

bottom