चंद्रपुरातील महाकाली यात्रेत पत्रकारांना मारहाण

चंद्रपुरात पत्रकारांना मारहाण

1278

News34 chandrapur

 

चंद्रपूर – कोरोना महामारीत 2 वर्षे चंद्रपूरची आराध्य दैवत महाकाली देवीच्या यात्रेत बंदी घालण्यात आली होती, 2 वर्षांनी महाकाली देवीच्या यात्रेची सुरुवात झाली, त्यामुळे भाविकांनी यंदा हजारोंच्या संख्येत देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. Mahakali mandir chandrapur

देवीच्या यात्रेत चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी सोयी सुविधेचा आढावा घेतला होता.

मात्र प्रत्यक्षात कुणीही मूलभूत सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या नाही, यावेळी सर्व भाविक भगवान भरोसे आपली व्यवस्था करीत आहे.

प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाची बातमी बनविण्यासाठी 5 एप्रिलला चंद्रपुरातील पार्थशर समाचार चे 2 प्रतिनिधी वार्तांकन करण्यासाठी गेले असता पोलिसांनी दोघांना पकडले व काही न विचारता त्यांना मारहाण केली.

पार्थशर समाचार चे प्रतिनिधी नेमन धनकर व सुनील देवांगण हे दोघे झरपट नदीच्या पुलावर व्हिडीओ घेत होते, दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या अंघोळीची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने महिला व पुरुष वर्ग झरपट नदीच्या घाटावर अंघोळ करीत आहे, ते पुलावरून वार्तांकन करीत असताना शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी गेडाम यांनी दोघांना पकडत कसलीही विचारणा न करता सरळ मारहाण केली.

दोघांनी गेडाम यांना बातमीसाठी व्हिडीओ घेत असल्याचे सांगितले मात्र त्यांचं काही न ऐकता नेमन धनकर वर गेडाम यांनी हात उचलला.
त्यानंतर दोघांना महाकाली मंदिर परिसरातील पोलीस चौकीत नेण्यात आले, तिथेही नेमन वर हात उचलण्यात आले.

काही वेळात सुनील ने पार्थशर समाचार च्या संपादक राजेश नायडू यांना याबाबत माहिती दिली असता ते तात्काळ चौकीत पोहचले.

पोलीस अधिकारी गेडाम यांना नायडू नी स्पष्ट विचारले असता आधी दोघांना व्हिडीओ कशाला शूट करीत आहे त्याबाबत विचारायला हवे होते मात्र तुम्ही त्यांचं काही न ऐकता त्यांच्यावर हात उचलत वार्तांकन केलेला व्हिडीओ सुद्धा डिलीट केला. विशेष म्हणजे व्हिडीओ जर्नलिस्ट नेमन व सुनील च्या गळ्यात पार्थशर समाचार चे आयकार्ड असून सुद्धा गेडाम यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

कसलीही विचारणा न करता पत्रकारांवर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हात उचलायला नको, याविरोधात पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांना याबाबत निवेदन देणार आहे.

bottom