चंद्रपूर जिल्ह्यात आढळला बिबट्याचा मृतदेह

बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

502

News34 chandrapur

 

चंद्रपूर /नागभीड – 4 दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या मादा बिबट्याचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला.
नागभीड वनपरिक्षेत्रातील मासली बिटात शेत शिवारात असलेल्या विहिरीत आज मादा बिबटचा मृतदेह आज आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहचले.
सायगाता रोडवर लागून असलेल्या भैयाजी मानकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत सकाळी बिबट मृतावस्थेत आढळला, वनविभागाने बिबट्याचा मृतदेह बाहेर काढत, शवविच्छेदन केले असता सदर मादी बिबटचा मृत्यू 4 दिवस आधी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला, शिकारीसाठी पाठलाग करीत असताना बिबट विहिरीत पडला असावा असा अंदाज यावेळी वनविभागाने लावला. मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत होते.
बिबटचा मृतदेह घटनास्थळी जाळण्यात आला, यावेळी पशु विकास अधिकारी ममता वानखेडे, व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
bottom