आकाशातून कामगाराच्या अंगावर कोसळला मृत्यू

मृत्यू कॅमेऱ्यात कैद

1273

News34 chandrapur

 

चंद्रपूर – जिल्ह्यात सलग चार दिवसापासून वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अंगावर शहारा आणणारा एक व्हिडिओ वायरलं झाला आहे. Viral video

वेकोली खाण परिसरात एका कर्मचाऱ्याचा अंगावर थेट वीज कोसळली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. बाबु धनकुमार महेंद्र सिहं असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे. Viral

वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतुक करणाऱ्या बाबु धनकुमार महेंद्र सिहं या कर्मचाऱ्याचा अंगावर विज कोसळली.

ही घटना ( मंगळवार ) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात घडली.
या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. Lightning strike

मृतक बाबू धनकुमार महेंद्र सिहं हा माजरी खाणीतील के.जी. सिंग कंपनीत कर्मचारी होता.आज तो खाणीतील ओवर बर्डनची वाहतूक करीत होता. दरम्यान अचानक वादळ सुरु झाले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. तो चालत असताना त्याचा अंगावर वीज कोसळली.यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर कर्मचारी मुळचा बिहार राज्यातील आहे. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती कळविण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

bottom