महात्मा फुलेंचे विचारचं सर्व समाजाला पुढे नेऊ शकतात – संध्याताई गुरनुले

महात्मा फुले यांचं कार्य समाजाला पुणे नेण्यासाठी

267

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – बहुजन समाजाला शिक्षणाचे धडे देणारे, चातुर्वर्ण्य व्ययस्थेविरुद्ध व जातिप्रथेविरुद्ध बंड करून बहुजन समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय अशा मानवतावादी मूल्यांचे बीजारोपण करणारे, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे, पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती उत्सव साजरी करणारे आणि ,सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे विचारच सर्व समाजाला पुढे नेऊ शकतात असे अमूल्य मार्गदर्शन समाजाच्या ज्येष्ठ नेत्या माजी जी.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी फुले जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्त व्यक्त केले. माळी महासंघ व क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंसथेच्या वतीने सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Mahatma jyotiba phule

प्रमुख अतिथी माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.पद्माकर लेनगुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव व संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, समाजातील उद्योजक हसन वाढई, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस व संस्थेचे उपाध्यक्ष गुरुदास चौधरी मान्यवर यांचे हस्ते क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. महात्मा फुलेंच्या विचारांची सर्व समाज बांधवांनी प्रेरणा घेऊन कार्य करावे असे प्रा.रामभाऊ महाडोळे असे सांगितले.

कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका रत्नमाला ठाकरे, वंदना गुरनुले, रत्ना चौधरी, आशाताई नागोशे. नंदाताई शेंडे, माधुरी गुरनुले, इंदू मांदाले, शिक्षक जितेंद्र लेंनगुरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, सुखदेव मंदाळे, माळी महासंघाचे जिल्हा युवा अध्यक्ष राकेश ठाकरे, ईश्वर लोंनबले, ओंमदेव मोहूर्ले, गणेश सोनुले, अशोक महाडोळे, श्रीनिवास टिकले, आदींनी प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक आर. टी. गुरनुले यांनी केले.तर आभार भाऊजी लेनगुरे यांनी मानले. कार्यक्रमाची पूर्व तयारी पिंटू महाडोळे, संदीप वाढई, यांनी केले.

bottom