चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

वनमंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार

884

News34 chandrapur

चंद्रपूर : जगप्रसिध्‍द ताडोबा व्‍याघ्र प्र‍कल्‍प बघण्‍यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात आहे. त्‍यामुळे हमखास व्‍याघ्र दर्शनासाठी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पामध्‍ये पर्यटन केले जाते. याच पर्यटनाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील २४० दिव्यांग बांधवांनी घेतला. Tadoba jungle safari

ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प बघता यावा, अशी इच्‍छा विकलांग एकता शक्‍ती संघटना बल्‍लारपूर जि. चंद्रपूर येथील दिव्‍यांग बांधवांनी राज्‍याचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे व्‍यक्‍त केली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत ताडोबा-अंधारीच्या अधिकाऱ्यांना सूचना करीत दिव्यांगांना ताडोबा सफर घडवावी असे सांगितले. त्यानुसार २ ते ७ एप्रिल २०२३ पर्यंत टप्याटप्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी वन पर्यटनाचा लाभ घेतला.यावेळी दिव्यांगासोबत पालकांनी ताडोबा सफारी केली. Tadoba national park

बल्‍लारपूर येथील विकलांग एकता शक्‍ती संघटनेच्‍या माध्यमातून २४० दिव्‍यांग बांधवांची आणि त्यांच्या पालकांनी ताडोबा भ्रमंती केली . दिव्‍यांग बांधवांनी ताडोबातील पशू-पक्षी, विविध वृक्ष, विविध प्राणी, ताडोबातील जैवविविधतेचा मनसोक्‍त आनंद लुटला. श्री. सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्‍या माध्‍यमातून हे पर्यटन दर्शन घडविण्‍यात आले. यावेळी वन मार्गदर्शकांनी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाविषयी संपूर्ण माहिती देऊन ताडोबा पर्यटनाचे महत्‍व अधोरेखित केले. यावेळी दिव्‍यांग बांधवांच्‍या चेहऱ्यावरचे हसू आणि समाधान बघण्‍यासारखे होते. यावेळी दिव्‍यांग बांधवांना खाद्य किट्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा महानगर चंद्रपूरचे कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे व वनाधिकारी यांच्‍या माध्‍यमातून ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प दाखविण्‍यात आला. यावेळी दिव्‍यांग बांधवांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

bottom