चंद्रपूर जिल्ह्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू

म्हशी चारायला गेला आणि मृत्यूला कवटाळला

1189

News34 chandrapur

(प्रशांत गेडाम)
ब्रम्हपुरी – तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे विज पडून इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना २२ एप्रिल २०२३ ला ५:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. नवलाजी बळीजी लडके वय अंदाजे ४० असे वीज पडुन दुर्दैवी मृत्यु झालेल्या इसमाच नाव आहे. Vijecha kadkadat

मृतक नवलाजी हे गावातील घरच्या म्हशी राखायला गेला होता, मागील चार ते पाच दिवसापासून तालुक्यातच नाही तर विदर्भात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाने हजेरी लावली असुन आज सुद्धा अवकाळी पावसाने विजांच्या कडडाटासह हजेरी लावली त्या मध्ये म्हशी चारत असतांना नवलाजी च्या अंगावर विज पडून नवलाजीचा मृत्यु झाला. Lightning in chandrapur

मृतक नवलाजीच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. नवलाजी अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व कुटुंबातील कर्ता इसम असुन त्याच्या जाण्याने लड़के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Yellow alert in chandrapur

bottom