शिवानी वडेट्टीवार – उपमुख्यमंत्री फडणवीस व वनमंत्री मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

सावरकर यांच्यावरून कांग्रेस पुन्हा खोलात

1135

News34 chandrapur

चंद्रपूर – फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेणार नाही मात्र सावरकर यांची गौरव यात्रा काढणार, मात्र त्या सावरकरांचे विचार हे अत्यंत चुकीचे असून त्यांनी बलात्काराला राजकीय शस्त्र म्हणून राजकीय विरोधकांपुढे वापरावा या विचाराचे सावरकर होते अशी टीका युवक कांग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील एका सभेत केली. Shivani wadettiwar

याबाबत वडेट्टीवार यांनी तसा व्हिडीओ ट्विट केला आहे.

त्या व्हिडीओ नंतर शिवानी वडेट्टीवार यांच्यावर टीकेचे पडसाद उमटू लागले, सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी खुलं आवाहन देऊन ते विचार कोणत्या पुस्तकात लिहले आहे ते सिद्ध करून दाखवा. Veer savarkar

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वडेट्टीवार यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की काही लोकांना इतिहास, वर्तमान माहीत नसतो, काही बुद्धिवादी तर्क मांडला असता तर ठीक असत, सदर वक्तव्य बिन बुद्धीचे व बिना तर्कचे आहे.

कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा सावरकर यांच्यावर टीका केली होती मात्र त्यावेळी राज्य कांग्रेसने त्यावर आक्षेप नोंदविला होता, गांधी यांच्या प्रतिक्रियेचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेत, सावरकर यांची बदनामी सहन करणार नाही अशी चेतावणी दिली होती.

मात्र आता कांग्रेस पक्षाचे आमदार माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या युवक कांग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे काय समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधत, कांग्रेसच्या नेत्यांना इतिहास माहीत नाही तर त्यांच्या कार्यकर्त्याला काय माहित असणार, सध्या कांग्रेसची स्थिती ही राजकीय आत्महत्या वर पोहचली असून अश्या वक्तव्यावर जनता त्यांना कधी माफ करणार नाही.

bottom