चंद्रपुरातील त्या 2 मित्रांचा दुर्दैवी अंत

शेवटची सकाळ

2398

News34 chandrapur

भद्रावती : वरोऱ्यावरून चंद्रपूरला जात असलेल्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलीस ट्राफिक बॅरिकेटला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोन युवकांचा मृत्यू झाला.

सदर घटना दिनांक 14 रोज शुक्रवारला भद्रावती शहराजवळील मानोरा फाट्याजवळ सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली अंकुश सुनील भडगरे वय 23 वर्षे व 22 वर्षीय हर्ष सुरेश पाचभाई असे मृतक युवकांचे नाव आहे.

हे दोन्ही युवक वरोरा शहरातील रहिवासी होते. मृतक दोन्ही युवक हे आपल्या duke दुचाकीने चंद्रपूरला जात होते दरम्यान मानोरा फाट्याजवळ असताना युवकांचे नियंत्रण गेल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटला जोरदार धडकली, यात या दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भद्रावती पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करीत आहे.

bottom