अखेर सिंदेवाही पोलिसांना यश मिळालं

ओळख पटली

1307

News34 chandrapur

 

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही –
सिंदेवाही शहरातील जुना बसस्थानक बाजार चौकातील सोमेश्वर मंदीराचा वरील भागात शुक्रवारी दि. 28 एप्रिल ला सांयकाळी 6 वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.

मृतदेह आढळल्याची वार्ता शहरात पसरल्याने शेकडो नागरिकांची घटनास्थळावर गर्दी जमली, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहचली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे शवविच्छेदनासाठी पाठविला होता. सिंदेवाही पोलीसांनी सदर मृतक व्यक्तीची तपासणी केले असता आधार कार्ड वरून मृतकाची ओळख पटली असुन मृतकाचे नाव – रामदास मेश्राम वय -57 वाल्मीक चौक रा. सिंदेवाही असे आहे. सदर घटनेचा पुढील तपास सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण हे करीत आहेत.

bottom