चित्रपटातील दृष्य जेव्हा चंद्रपुरात घडतं

चंद्रपूर the burning car

1076

News34 chandrapur

 

चंद्रपूर – एखादे वाहन झाडाला धडक देते.उंचावरून कोसळते अन वाहन पेट घेत.हजारो चित्रपटात असं दृश्य तुम्ही बघितलं असेल. चंद्रपुरात असं प्रत्यक्ष घडल आहे. The burning car

चारचाकी वाहनवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहनाने थेट झाडाला धडक दिली. धडकेनंतर कारने पेट घेतला. योगायोगाने कारमधील प्रवाशी बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही थरारक घटना सावली तालुक्यातील पाथरी येथील आसोलामेंढा नहराजवळील वळणावर सोमवारला घडली. Burning car in chandrapur

चंद्रपूर येथील राहुल रामचंद्र जुमनाके आणि त्यांचे नातेवाईक गौरव कुसराम, सौरव कुसराम हे तिघेही कारने आसोलामेंढा येथे निघाले होते.आसोलामेंढा येथील नातेवाईकांना सोडून ते परत चंद्रपूरला जात असताना पाथरी येथील नहरानजीक चालक राहुल जुमनाके यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले.कारने थेट झाडाला धडक दिली.या धडाकेत कार मधील तिघांना किरकोळ जखम झाली आहे.धडकेनंतर तिघे कारच्या बाहेर आलेत. नेमक त्याचवेळी कारने पेट घेतला.

काही क्षणातच कार जळून खाक झाली. घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

bottom