सिंदेवाही शहरातील बाजार चौकात आढळला कुजलेला मृतदेह

बाजार चौकात आढळला मृतदेह

1499

News34 chandrapur

 

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायत हद्दीतील बाजार चौकातील सोमेश्वर महाराजांच्या मंदिराच्या वरील भागात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. Crime update

जवळपास काम करीत असलेल्या काही कामगारांना काम करीत असताना दुर्गंध आली,  उग्र दुर्गंध कशाची हे बघितले असता त्यांना मंदिराच्या वरील भागात
एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मूतदेह आढळला. Sindewahi news

शुक्रवार दिनांक 28 एप्रिल ला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ ब्रह्मपुरी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शिंदे व सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण हे आपल्या पोलीस टीम सहित घटनास्थळी दाखल झाले. Chandrapur police

मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले आहे,
पुढील तपास सिंदेवाही चे पोलीस करीत आहेत.

bottom