चंद्रपुरातील Eden’s बचत निधीत फसवणुकीचा आकडा पोहचला 58 लाखांवर

अब तक 58 लाख

2590

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरातील अनेक नागरिकांना जास्त व्याजाचे आमिष दाखवीत Eden’s बचत निधीत द्वारे फसवणूक करणारे 4 संचालकांना रविवारी न्यायालयापुढे हजर केले असता चारही संचालकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चंद्रपुरातील edens बचत निधीचे कार्यालय बंद करून नागपुरात नवे कार्यालय संचालक शाहुल शिमोन व इतर संचालकांनी सुरू केले, नागरिकांच्या पैशावर मजा मारणाऱ्या या संचालकांविरुद्ध दुर्गापुरातील गुंतवणूकदार जोसेफ रामटेके यांनी 29 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

रामटेके यांनी सांगितले की माझे बाबा नुकतेच वेकोली मधून सेवानिवृत्त झाले होते, त्यावेळी संचालक शाहुल शिमोन, संजय रामटेके, जितेंद्र थुलकर व सुधाकर ईटेकर यांनी वारंवार माझ्या वडिलांना पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला, संचालकांनी वडिलांना जास्त व्याजाचे आमिष दाखवीत फसविले, काही काळानंतर आमचे पैसे आम्हाला परत देण्यास टाळाटाळ होऊ लागली, गुंतवणूक दार वारंवार बचत निधीच्या कार्यालयाच्या चकरा मारायला लागल्याने चंद्रपुरातील कार्यालय बंद करण्यात आले होते.

जोसेफ रामटेके यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यावर 4 संचालकांना अटक झाली, त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली, आज 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार या 4 संचालक विरोधात दाखल झाली असून आता MPID अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात edens ने नागपूर, बुट्टीबोरी, राजुरा व गडचांदूर येथे कार्यालय सुरू केले होते, त्याठिकाणी असाच गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.

Chandrapur police

24 फेब्रुवारी 2018 ला ही कंपनी स्थापन करण्यात आली होती, गेल्या 5 वर्षात या बचत निधीमध्ये किती रुपयांचा व्यवहार झाला असेल हे पोलीस तपासात उघडकीस येणारचं.

bottom